वज्रमूठ सभा रद्द होणार नाहीत, नियोजन सुरू; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

वज्रमूठ सभा रद्द होणार नाहीत, नियोजन सुरू; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 04, 2023 | 1:48 PM

तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यामध्ये आलेल्या दुराव्यामुळे आणि त्यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे येथून पुढच्या सभा या होणार नाहीत असे भाजपचे नेते सांगत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वज्रमूठ सभे संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. यामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. तर याघोषणेमुळं वज्रमूठ सभा रद्द करण्यात आल्याचे समोर येत आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यामध्ये आलेल्या दुराव्यामुळे आणि त्यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे येथून पुढच्या सभा या होणार नाहीत असे भाजपचे नेते सांगत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वज्रमूठ सभे संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, मे महिन्यातील प्रचंड उष्णता, पावसाचे संकेत यामुळे सभा अरेंज करण अवघड आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, नाशिक इथे पुढच्या सभा आहेत. म्हणून आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला की, तूर्तास सभा टाळल्या आहेत. मे महिन्यातल्या सभा या जरी सहा वाजता असल्यातरी लोकांना दोन वाजता निघावं लागतं. अनेक कार्यकर्ते तर चार साडेचार पाचलाच सभासस्थानी येऊन बसतात. प्रचंड त्रास लोकांना होतो. हे आम्हाला मुंबईच्या सभेत निदर्शनाला आलं आणि म्हणून आम्ही एकत्रित बसून ठरवलं की तूर्त या हवामानाचा विचार करता या सभा टाळू. आणि पुन्हा थोडं हवामान दुरुस्त झालं तर नियोजन करू.

Published on: May 04, 2023 01:48 PM