भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याने सर्वात जास्त मी संतुष्ट- शरद पवार

भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याने सर्वात जास्त मी संतुष्ट- शरद पवार

| Updated on: Feb 22, 2023 | 3:12 PM

भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदावरून पायउतार झाले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

पिंपरी चिंचवड : भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदावरून पायउतार झाले. त्यांच्या जागी आता रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल झाले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून गेले. त्यामुळे सर्वात जास्त मी संतुष्ट आहे, असं शरद पवार म्हणालेत. भाजपचे उद्योग तुम्हाला माहितीच आहेत. पण आणखी पाहायचे असतील तर एकनाथ खडसे आहेत ते सांगतील, असंही शरद पवार म्हणालेत. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

Published on: Feb 22, 2023 01:48 PM