पहाटेच्या शपथविधीचा 'हा' मोठा फायदा झाला; फडणवीसांच्या आरोपांनंतर पवारांची सविस्तर प्रतिक्रिया

पहाटेच्या शपथविधीचा ‘हा’ मोठा फायदा झाला; फडणवीसांच्या आरोपांनंतर पवारांची सविस्तर प्रतिक्रिया

| Updated on: Feb 22, 2023 | 3:11 PM

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 ला पहाटेशपथ घेतली आणि सरकार स्थापन झालं. यावरून देवेंद्र फडणवीसांनी tv9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. त्याला पवारांनी उत्तर दिलं आहे.

पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 ला पहाटे शपथ घेतली आणि सरकार स्थापन झालं. पण ते सरकार अवघ्या काही तासातच कोसळलं. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आणणाऱ्या या पहाटेच्या शपथविधीविषयी आजही चर्चा होते. टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना या शपथविधीची कल्पना होती, असं म्हटलं. त्याला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पहाटे शपथ घेत सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट निघाली. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट आहे की, राज्यात काहीही झालं तरी एका व्यक्तीचे नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाल्यावर तर येतंच येतं, असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Feb 22, 2023 01:22 PM