केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय 125 तास रेकॉर्डिंग अशक्य - शरद पवार

केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय 125 तास रेकॉर्डिंग अशक्य – शरद पवार

| Updated on: Mar 09, 2022 | 12:44 PM

एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईः एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील (Fadanvis Video Bomb) सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे.

Published on: Mar 09, 2022 12:44 PM