सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा नेता गमावला; शरद पवार यांच्याकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली
Girish Bapat Passed Away : चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दी, सर्वसमावेशक भूमिका घेणारा नेता काळाच्या पडद्याआड; शरद पवार यांच्याकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असं शरद पवार म्हणालेत.
Published on: Mar 29, 2023 02:04 PM
Latest Videos