2024 ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं...

2024 ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं…

| Updated on: Mar 06, 2023 | 10:45 AM

आताच्या महविकास आघाडी म्हणून सगळे काम करत होते. येत्या निवडणुकांबाबत महविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना आम्ही चर्चा करू नंतर निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणालेत.

मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आवघे काही महिने शिल्लक राहिल आहेत. अशात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र लढणार का?, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “माझा प्रयत्न राहील की येती विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील. एकत्र निवडणुका लढतील अन् जिंकतीलही”, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार आज पुण्यात बोलत होते.

Published on: Mar 06, 2023 10:43 AM