Video ” देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्वीट मी इन्जॉय करतोय- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला चढवलाय. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद फोफावला, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देवेंद्र फडणवीस यांनी धडाधड 14 […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला चढवलाय. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद फोफावला, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देवेंद्र फडणवीस यांनी धडाधड 14 ट्वीट करत शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुस्लिमांचं लांगुलचालन आणि जातीवादाचा आरोप केला. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या आरोपांवर आज शरद पवार यांना विचारणा केली असता पवारांनी राष्ट्रवादीचं नेतृत्वत केलेल्या ओबीसी आणि आदिवासी नेत्यांची यादी वाचली. तसंच पक्षाची निती एका जातीभोवती सीमित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.