असेल नसेल ती लावा ताकद, करा तपास, जर..., शरद पवार यांचं पंतप्रधान मोदी यांना खुलं आव्हान

“असेल नसेल ती लावा ताकद, करा तपास, जर…”, शरद पवार यांचं पंतप्रधान मोदी यांना खुलं आव्हान

| Updated on: Jul 09, 2023 | 12:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल येवल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोदक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी ओपन चॅलेंजही दिलं आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल येवल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोदक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी ओपन चॅलेंजही दिलं आहे.ते म्हणाले की, “दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्या आरोपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ते शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील.”