‘पत्नीच्या निधनानंतर खूप हळवे झाले होते, अन् आज हा वृक्ष…’; महानोर यांना शरद पवार यांची श्रद्धाजंली
ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केलं अशी प्रतिक्रिया रानकवी ना. धों. महानोर यांचं निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आठवणं सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई | 03 ऑगस्ट 2023 : माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केलं अशी प्रतिक्रिया रानकवी ना. धों. महानोर यांचं निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आठवणं सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. महानोर यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावर राजकारणासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजली वाहिल्या आहेत. यावेळी पवार यांनी, ना. धों यांची विधान परिषदेतील भाषणं माणसाच्या काळजाचा ठाव घेणारी होती. तर त्यांच्या पत्नीच्या निधनाने ते खचले होते. त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम मी आणि प्रतिभा यांनी केलं. मात्र आज अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे असं जाणं मनाला चटका लाऊन जाणारा आहे. तर मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो असेही पवार यांनी म्हटलं आहे.