सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही; शरद पवारांनी ठणकावले

सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही; शरद पवारांनी ठणकावले

| Updated on: Mar 09, 2022 | 12:20 PM

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) कुणी धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यांना तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाहीत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली.

मुंबईः महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) कुणी धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यांना तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाहीत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Sting operation) यांनी विधानसभेत केलेल्या खळबळजनक आरोपानंतर पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारकडून भाजप नेत्यांविरोधात कशाप्रकारे कट रचला गेला आणि हा सगळा प्लॅन  विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात ठरल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासंबंधीचे 125 तासांचे व्हिडिओ फुटेज त्यांनी सादर केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे

Published on: Mar 09, 2022 12:20 PM