ठाकरे बंधूंनी एकत्र यावंसं वाटतं का? शरद पवार म्हणाले...

ठाकरे बंधूंनी एकत्र यावंसं वाटतं का? शरद पवार म्हणाले…

| Updated on: Jul 09, 2023 | 8:52 AM

राज्यातील राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान आता शरद पवार यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

नाशिक : महाराष्ट्रात वर्षभरात 2 राजकीय भूकपं झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत मोठा गट आपल्यासोबत नेला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड पुकारलं. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान आता शरद पवार यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत आपलं मत मांडलं आहे. ठाकरे बंधू एकत्र यावं असं वाटतं का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे-राज ठाकरे दोघे एकत्र आले तर आनंद आहे.” पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं.

Published on: Jul 09, 2023 08:52 AM