पवार यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव कोअर कमिटीने नाकारला; केली 'ही' विनंती

पवार यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव कोअर कमिटीने नाकारला; केली ‘ही’ विनंती

| Updated on: May 05, 2023 | 12:20 PM

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली

मुंबई : शरद पवार यांनी राजीनामा देऊन आज तीन दिवस होत आहेत. त्यांचं मन वळविण्याचे सुरू आहे. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांना पक्षाचे नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला तर त्यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या बैठकीत सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

Published on: May 05, 2023 12:20 PM