16 आमदारांचा निकाल लागताच सगळं बदलणार; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

16 आमदारांचा निकाल लागताच सगळं बदलणार; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

| Updated on: May 05, 2023 | 11:43 AM

11 तारखेनंतर राज्याच्या सत्ता संघर्षावरील पडदा उठणार. 16 आमदारांचा निकाल लागणार असे कायदातज्ज्ञ बोलत आहेत. तर त्यानंतर हे सरकार पडणार असेही कायदातज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शरदा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे, केंद्रातील मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. तर 11 तारखेनंतर राज्याच्या सत्ता संघर्षावरील पडदा उठणार. 16 आमदारांचा निकाल लागणार असे कायदातज्ज्ञ बोलत आहेत. तर त्यानंतर हे सरकार पडणार असेही कायदातज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. यामुद्द्यावरून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 16 आमदारांबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागावा अशी सर्वांची इच्छा आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत. त्याआधी हा निकाल लागल्यास राज्यातील राजकीय परिस्थिती बदलू शकेल असं मोठं विधान केलं आहे. तर सध्या राजकीय परिस्थितीबाबत जे अंदाज बांधले जात आहे ते खरे ठरतात का हेही पाहणं उत्सुकता असल्याचे म्हटलं आहे.

Published on: May 05, 2023 11:43 AM