कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण…काय म्हणाले शरद पवार
बारामतीच्या निवडणूकीकडे पुन्हा एकदा देशाचे लक्ष लागले आहे. अजितदादा यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना निवडणूकीला उतरविण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादा यांनी प्रथमच बारामतीत तळ ठोकला आहे. तर शरद पवार यांनी बारामतीत अजून सभाही घेतलेली नाही.
राज्यात विधानसभा निवडणूकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. लोकसभेला बारामतीत अजितदादांच्या यांच्या पत्नी सुनेत्रा आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे असा पवार घराण्यातच सामना रंगला. यात सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता बारामतीतून शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार अजितदादा यांच्या विरोधात उभे राहीले आहेत. त्यामुळे अजित पवार बारामतीत अडकून पडले आहेत. या संदर्भात अजितदादांना मतदारांना भावनिक होऊ नका…मागच्या वेळ लोकसभेत केली तशी गंमत करु नका. नाही तुमची जम्मत होईल. शरद पवारांनी दीड वर्षांनी आपण राजकारणात नसणार असे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी वाली नसणार असे अजितदादा बारामतीकरांना उद्देश्यून म्हणाले आहेत. यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. गंमत केली म्हणजे काय केले मतदान नाही केले. कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण लोकांनी म्हणायला पाहीजे ना असा टोला शरद पवार यांनी अजितदादांना लगावला आहे.