Supriya Sule on Sharad Pawar | राष्ट्रपती पदाची निवडणूक शरद पवार लढणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांच नाव समोर येणं किंवा तस समोर आणणं हे त्यांच मोठेपणा आहे. पण मला वाटतं की तेही निवडणूक लढवणार नाहीत. तर याच्या आधीच त्यांनी तसा नकार ही दिला आहे.
देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या (President) निवडणुकीचा बिगुल हा वाजला आहे. या निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्षांकडून योग्य नावाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान मागील काही दिलसांपासून राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव राष्ट्रपदीपदावरून चांगलेच चर्चेत आहे. त्यावरूनच राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या, हे नाव देशाती विरोधी पक्षांनी सुचवलं आहे. मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे. हे लोक पवार साहेब यांचा जो मान राखतात ते आयुष्यभर लक्षात राहील. तर राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांच नाव समोर येणं किंवा तस समोर आणणं हे त्यांच मोठेपणा आहे. पण मला वाटतं की तेही निवडणूक लढवणार नाहीत. तर याच्या आधीच त्यांनी तसा नकार ही दिला आहे.