लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Apr 20, 2024 | 10:55 AM

५० टक्केपक्षा जास्त जागांवर महविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे.सध्या शरद पवार हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, लोकसभेसाठी राष्ट्रवादी फक्त दहा जागांवर उमेदवार देत आहे.2019 मध्ये आमचे चार खासदार होते. मात्र आता आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्या आहेत असं शरद पवार म्हणाले. त्याच बरोबर ५० टक्केपक्षा जास्त जागांवर महविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे

Published on: Apr 20, 2024 10:55 AM