पवारांचे परखड भाष्य, ठाकरे याचं सडेतोड उत्तर; काय सुरू आहे? लोक माझा सांगातीवरून
मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. याच्या पलीकडे मी काही बोलणे योग्य नाही. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटत होतो. पण...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरून राज्यात खळबळ उडाली असतानाच शरद पवार यांनीच दुसरा खळबळ जनक दावा हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलं आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी विरोधात शिवसेना असा कलगितूरा पहायला मिळत आहे. पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीतून उद्धव ठाकरे यांच्यावर परखड भाष्य करताना ठाकरे यांचे फक्त दोनदा मंत्रालयात जाणे हे पचनी पडणारे नव्हते, म्हणाले. पवारांच्या पुस्तकांतील रोखठोक विधानावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलंय. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. याच्या पलीकडे मी काही बोलणे योग्य नाही. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटत होतो. पण… तर अनुभव नसल्यानं हे सर्व घडत होतं. तरीही ते टाळता आलं असतं. संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असा आरोपही पवार यांनी लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात केला. त्यावर नेत्यांचा कार्यकर्त्यावर असतो तेवढाच अधिकारी कार्यकर्त्यांचा नेत्यावर असतो. त्यामुळे सर्वांच्या हिताचे शरद पवार निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला कसा देणार. आणि दिलेला सल्ला पचनी पडला नाही तर काय करू. शरद पवार यांच्या आरोपानंतर ठाकरे यांचे उत्तर आल्याने सध्या आरोप प्रत्यारोपाचे सत्र पहायला मिळत आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट