Ramdas Kadam on Thackeray | शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात गुजगोष्टी केल्या आणि न्यायालयीन लढाई सुरु झाली, रामदास कदम यांची आरोपांची राळ

Ramdas Kadam on Thackeray | शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात गुजगोष्टी केल्या आणि न्यायालयीन लढाई सुरु झाली, रामदास कदम यांची आरोपांची राळ

| Updated on: Aug 07, 2022 | 4:24 PM

Ramdas Kadam on Thackeray | शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानात गुजगोष्टी केल्या आणि त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरु झाल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.

Ramdas Kadam on Thackeray | शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्या समेट घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या कानात गुजगोष्टी केल्या आणि त्यानंतर शिंदे गटाविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरु केल्याच्या आरोपांची रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राळ उडवून दिली. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात न बोलण्याचे धोरण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. पण जनतेच्या मनात संभ्रम होऊ नये यासाठी वेळोवेळी स्पष्टीकरण देणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत कधीच युती होऊ दिली नसती. ते ज्या विचाराच्या विरोधात हयातभर लढले, त्यांच्यासोबत सत्तेत वाटेकरी होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होऊ दिले असता का? या प्रश्नांचं उत्तर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी शोधावे असे सांगतानाच दोघांनाही त्यांनी मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Published on: Aug 07, 2022 04:24 PM