‘खात्री नाहीतर विश्वास, शरद पवार मला…’; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय केला दावा?

| Updated on: Oct 18, 2024 | 3:54 PM

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना २५ जागांवर अद्याप तिढा कायम असून यामध्ये यवतमाळच्या जागेवरून शरद पवार गटाचे माजी आमदार आणि इच्छुक उमेदवारानं मोठा दावा केला आहे.

Follow us on

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना २५ जागांवर अद्याप तिढा कायम असून यामध्ये यवतमाळ या जागेचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून या जागेवर दावा केला जात आहे. यावर शरद पवार गटाचे माजी आमदार आणि इच्छुक उमेदवार संदीप बाजोरिया यांनी भाष्य केले आहे. ‘यवतमाळच्या जागेवर महाविकास आघाडीतील ३ पक्ष दावा करत आहे. गेली सहा वर्ष आमदार असताना चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार मला संधी देतील’, असा विश्वास संदीप बाजोरिया यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते असेही म्हणले की, अद्याप यवतमाळमधील जागा कोणाला देण्यात आली नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष दावा करत आहेत. याभागातील इच्छुक उमेदवार आहेत. त्यापैकी मी कणभर जास्त काम केले. दिवसेंदिवस जनसामान्यांचा मिळणारा पाठिंबा वाढलेला आहे. प्रत्येक समाज घटकातून मला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होताय. खात्री नाही तर मला विश्वास आहे, शरद पवार मला संधी देतील, असे म्हणत संदीप बाजोरिया यांनी विश्वास व्यक्त केला.