Special Report | संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांचं नो कॉमेन्ट्स
महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार आणि संजय राऊतांचाच महत्वाचा रोल होता. त्यामुळं गेल्या अडीच वर्षात तर पवार-राऊत फार जवळ आले होते. मात्र आता राऊतांना ईडीनं अटक झाल्यावर, पवारांनी प्रतिक्रियाही न देणं याकडे आश्चर्य म्हणून पाहिलं जातंय. तर राऊतांचा प्यादा सारखा वापर संपला, अशी बोचरी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी दिलीय.
मुंबई : संजय राऊतांना ईडीनं अटक(ED arrest Sanjay Raut ) केली त्यावरुन दिल्लीत शरद पवारांना(Sharad Pawar) प्रश्न केला. पण पवारांनी राऊतांवरील ईडीच्या कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.विशेष म्हणजे राऊतांना अटक केल्यापासून त्यांनी कारवाई संदर्भात कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही. फक्त ट्विटरवर सूचक कव्हर पेज पवारांनी ठेवलंय. ज्यात दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे असं या कव्हरपेजवर लिहिलंय. पवार आणि राऊतांचे खास संबंध आहेत.
महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार आणि संजय राऊतांचाच महत्वाचा रोल होता. त्यामुळं गेल्या अडीच वर्षात तर पवार-राऊत फार जवळ आले होते. मात्र आता राऊतांना ईडीनं अटक झाल्यावर, पवारांनी प्रतिक्रियाही न देणं याकडे आश्चर्य म्हणून पाहिलं जातंय. तर राऊतांचा प्यादा सारखा वापर संपला, अशी बोचरी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी दिलीय.
शरद पवारांनी राऊतांवरील कारवाईवरुन कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसली..तरी शिंदे गटाला भलताच आनंद झालाय. रोजचा सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला असा तिखट वार स्वत: मुख्यमंत्र्यांनी केलाय.