मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: May 16, 2024 | 10:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या काळात कांदा प्रश्नासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्याला आता शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय

Sharad Pawar On Narendra Modi : नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेमध्ये कांद्याच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्याच प्रश्नाला आज शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मला काय केलं विचारण्या पेक्षा तुम्ही तुमच्या 10 वर्षाच्या काळात काय केलं हे आधी पहावं असा टोला देखील शरद पवार यांनी मोदींना लगावला आहे.

Published on: May 16, 2024 10:50 AM