Sharayu Deshmukh | पडळकरांची थोरातांवर टीका, लेकीचं चोख प्रत्त्युत्तर
पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येनं सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं.
भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख (Sharayu Deshmukh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येनं सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं प्रत्युत्तर शरयू देशमुख यांनी ट्विटद्वारे दिलं आहे.
Published on: Jun 30, 2021 08:39 AM
Latest Videos