“भाजपला शिंदे गटाची गरज संपली काय?”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा सवाल
आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात कोणाला सोबत घ्यायचे आणि कधी सोडायचे या केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा, 17 जुलै 2023 | आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात कोणाला सोबत घ्यायचे आणि कधी सोडायचे या केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भिवंडीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत काही आमदार खासदार नाराज असल्याची चर्चासमोर आल्यानंतर कदाचित आमदार गोरे यांच्या पोटातलं ओठावर आला असावं. याबरोबरच भाजपकडे बहुमत असून देखील राष्ट्रवादी फोडली याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची गरज संपली की काय असा प्रश्न निर्माण होतोय, यामुळेच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी असे उद्गार काढले असावेत,” असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.