“लवकरच शिंदे-फडणवीस युती संपवायची”, भावाच्या पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदे यांचा इशारा
"शिंदे -फडणवीस यांना आज माझ्या भावाला पक्षात घेऊन माझे घर फोडले आहे. मी ही लवकरच शिंदे फडणवीस युती तोडून दाखवतो, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. मात्र आम्ही प्रयत्न करण्याऐवजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार पडायला मंत्रिमंडळाचा विस्तार पण कारणीभूत होऊ शकतो अशीही शक्यता आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिंकात शिंदे यांच्या भावाने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला. याच पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “शिंदे -फडणवीस यांना आज माझ्या भावाला पक्षात घेऊन माझे घर फोडले आहे. मी ही लवकरच शिंदे फडणवीस युती तोडून दाखवतो, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. मात्र आम्ही प्रयत्न करण्याऐवजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार पडायला मंत्रिमंडळाचा विस्तार पण कारणीभूत होऊ शकतो”, अशीही शक्यता शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.”सरकार मधील बरेच लोकं नाराज आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काहीच प्रयत्न करावा लागू नये अशीही परिस्थिती येऊ शकते . कारण तुम्ही आमच्याकडे या सरकार बनवू असे सांगताना 50 खोक्याबरोबच अनेक आमिषे दाखविली गेली होती आणि ती जर पूर्ण झाली नाहीत तर त्याचा फटका देखील या सरकारकला बसू शकतो. त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करायची गरजच पडणार नाही”, असे शशिकांत शिंदे म्हणालेत. सांगलीत राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आले असताना शशिकांत शिंदे माध्यमाशी बोलत होते. “माझे घर फोडले त्या भाजप आणि शिंदेची ही युती संपवण्याचे मी आव्हान स्वीकारले असून यासाठी माझ्यापरीने या युतीविरोधात रान तापवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचेही” शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.