बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच राजकारण बंद करा, शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच राजकारण बंद करा”, शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

| Updated on: Jun 27, 2023 | 11:20 AM

शिवसेनेची 40 वर्ष जुनी असेललेली शाखा अनिधिकृत असल्याचं सांगत ती पाडण्यात आली. याघटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

मुंबई: शिवसेनेची 40 वर्ष जुनी असेललेली शाखा अनिधिकृत असल्याचं सांगत ती पाडण्यात आली. याघटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा चालवल्याचा कांगावा काही उबाठा सैनिक करतात. मी उबाठा सैनिकांना चॅलेंज करते ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर बुलडोजर चालवला आहे, असे काही लोकं मातोश्रीवर राहतात. त्यांनाही जाऊन जाब विचारा, तरच तुम्हाला शिवसैनिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे. जे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्यांचे पुत्र यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विधिमंडळात लावता आला नाही. युती शासन सत्तेवर येतात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सन्मानाने विधिमंडळात लावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच राजकारण बंद करा. बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी तोच हातोडा तुमच्याच डोक्यावर घातला असता आणि तुम्हाला वठणीवर आणलं असतं,” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Published on: Jun 27, 2023 11:20 AM