“त्या हिरव्या सापाला गांडूळ…”, शीतल म्हात्रे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर संतप्त टीका!
शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ठाणे : अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादी काँग्रेस च्या उरलेल्या गटाला काय म्हणणार मला माहित नाही, पण त्यांचा एक हिरव्या डोळ्यांचा साप इथे आहे.त्याचं गांडूळ कसं करायचं हे आपल्याला माहित आहे.”
Published on: Jul 14, 2023 11:10 AM
Latest Videos