“शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे”, अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अजित पवार आपल्या काही आमदरांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. अशात आता अजित पवार यांच्या सोबत गेलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अजित पवार आपल्या काही आमदरांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. अशात आता अजित पवार यांच्या सोबत गेलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेखर निकम म्हणाले की, “रात्री 11 वाजता अजित पवारांचा फोन आला आणि सर्व आमदारांना बोलावण्यात आले. बैठकीला सर्व नेते मंडळी उपस्थित होती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे चर्चा करत होते. दादांना मी आपल्यासोबत राहीन असा शब्द दिला होता. म्हणून मी मागे फिरलो नाही. काळजावर दगड ठेऊन मी निर्णय घेतला आहे. राजकारण सोडलेले बरे अशी माझी मानसिकता झाली आहे. दादांनी मला अडचणीवेळी कायम मदत केली आहे. शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे. अशावेळी आमच्यासारख्या लहान माणसाचे खूप हाल होतात. आता परिणामांची पर्वा नाही. मी अजित पवार यांच्यासोबत असून जे होईल ते होईल.”