Buldana ShivSena : बुलडाण्यात शिंदे गट आणि शिवसेनेत तुफान हाणामारी, गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्त्यांचा राडा

Buldana ShivSena : बुलडाण्यात शिंदे गट आणि शिवसेनेत तुफान हाणामारी, गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्त्यांचा राडा

| Updated on: Sep 03, 2022 | 7:30 PM

दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालणार नसल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं.

बुलडाण्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत तुफान राडा झालाय. शिवसेनेच्या सत्कार समारंभात घुसून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय. शिंदे गटाचे गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांना येथे राडा केला. दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालणार नसल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं. बाहेरून आलेले दोन-तीनशे लोकं होते. त्यांची काय अवस्था झाली असती समजू शकता. आम्हाला चांगल्या माध्यमातून पक्षाचं काम करायचं आहे. पण, आम्हाला वादविवाद करायचा नाही, असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं. शिंदे गटाचे नेते म्हणाले, शिवसेनेनं शांततेच्या मार्गानं आपला पक्ष वाढवावा. कृषी उत्पन्न बाजारसमितीचा वापर राजकीय कार्यक्रमासाठी कसा करता, असा सवालही विचारण्यात आला.

Published on: Sep 03, 2022 07:30 PM