Maharashtra politics : अमोल कोल्हे यांची घरवापसी, अजित पवार यांना 24 तासांतच पहिला धक्का, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीवर दावा सांगितला. तर आपल्याकडे 30 एक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे हे देखील राजभवनमध्ये उपस्थित होते.
मुंबई : कोणताही गाजावाज न करता अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीवर दावा सांगितला. तर आपल्याकडे 30 एक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे हे देखील राजभवनमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आज त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी कोल्हे यांनी, #मी_साहेबांसोबत अस म्हणत जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं अशी शायरी लिहली आहे. यानंतर हाच व्हिडिओ शेअर करत विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, पहिला मोहरा परत..! असे म्हटलं आहे.