जागावाटपात नवा ट्विस्ट, बावनकुळे म्हणाले, माझ्या…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जागा वाटपावरून वक्तव्य केलं. त्यानंतर ते माघार ही घेतल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे
मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचं काम सध्यातरी व्यवस्थित सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं 2023 चा अर्थसंकल्पही सादर केला आहे. याचदरम्यान विरोधकांकडून शिंदे गटात आलबेल नसल्याचं सांगतलं जात असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जागा वाटपावरून वक्तव्य केलं. त्यानंतर ते माघार ही घेतल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे. याच्याआधी बावनकुळे यांनी भाजपा 240 तर 48 जागा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिल्या जाणार असल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी आपलेच शब्द माघार घेतले आहेत. तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसल्याचेही स्पष्टीकरण देताना, आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केला गेला असं म्हटलं आहे. तर त्या व्हीडीओतील अर्धांच भाग दाखवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर 288 पैकी शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा जिंकणार आहोत असेही त्यांनी म्हटलं आहे.