मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य? नेत्यानं स्पष्टच शब्दात सांगितलं; ”नाराजी नाही… मात्र”
याचदरम्यान आता जोपर्यंत केंद्रातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे सुत्रांकडून कळत आहे. यावरून आता भाजपसह शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना, ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल’, असे सांगितले. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान आता जोपर्यंत केंद्रातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे सुत्रांकडून कळत आहे. यावरून आता भाजपसह शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू असल्याचे बोलले जात आहे. याचमुद्द्यावर भाजप नेते राम शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये कुठेही नाराजी नाहीये, असं शिंदे म्हणालेत. तर भाजप हा शिस्त असणारा पक्ष आहे. मात्र प्रत्येकाला अपेक्षा असते की किमान आफल्या नावाचा विचार व्हावा. त्यामुळे इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही. त्यामुळे या चर्चेला काही अर्थ नाही.