मुख्यमंत्री बदलांच्या चर्चेतच भाजपचा मोठा नेता शिंदेच्या बंगल्यावर, चर्चेला उधाण; काय आहे कारण?
विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लागल्याने तर या चर्चांना तर भरती आली आहे. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजकडून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आले आहेत.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून शिंदे-फडणवीस सरकार पडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार तर त्यांच्यावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चांना उत आला आहे. याच दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लागल्याने तर या चर्चांना तर भरती आली आहे. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजकडून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे शिंदे यांचा काउंडाऊन सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला भाजपचा एक मोठा नेता गेल्याने या सर्व घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर हा नेता कोण कोणी भेट घेतली आता अशी चर्चा होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सुमारे अर्धातास चर्चा केली. बावनकुळे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये रामगिरी निवासस्थानी अर्धातास चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.