देवेंद्र फडणवीसांवर का आली नामुष्की...

देवेंद्र फडणवीसांवर का आली नामुष्की…

| Updated on: Aug 09, 2022 | 8:27 PM

संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राजीनाम देण्यास भाग पाडले होते, मात्र आता ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यांनाच घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला अशी टीका विनायकर राऊत यांनी केली आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्यावेळी मंत्री संजय राठोड यांच्यावर महिलांसंदर्भात आरोप झाले आणि विरोधकांनी तत्कालिन विरोधक देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर ज्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, त्यांनाच आधी मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे एवढी नामुष्की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर का ओढावली तो आम्हाला प्रश्नच पडला असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राजीनाम देण्यास भाग पाडले होते, मात्र आता ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यांनाच घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला अशी टीका विनायकर राऊत यांनी केली आहे.

Published on: Aug 09, 2022 08:27 PM