फडणवीसांनाच स्वपक्ष आमदारानं दाखवला आरसा, अल्टिमेटही दिला; इशारा देत म्हणाला, अन्यथा पर्याय नाही…
निधी वाटपावरून नाराज असलेल्या भाजप आमदाराने थेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नाही तर जर ते झालं नाही तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे 3 दिवसात हा विषयच संपवा असाही अल्टिमेटच दिला आहे.
मुंबई : निधी वाटपावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावरूनच भाजपमध्येही धूसफूस सुरू असल्याचं समोर आलं आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या भाजप आमदाराने थेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नाही तर जर ते झालं नाही तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे 3 दिवसात हा विषयच संपवा असाही अल्टिमेटच दिला आहे. कारंजा शहरासाठी नगर पंचायतीला दिलेला निधी आपल्याला विश्वासात न घेता दिलाय. हा निधी आष्टी नगर पंचायत आणि आर्वी नगर पालिकेला वळता करावा, अन्यथा आपण राजीनामा देणार असल्याचा इशारा आर्वी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे आता भाजपमध्येच काहीच अलबेल नाही असा सुर विरोधकांच्यामधून येत आहे. तर या पत्रावरून भाजपवर टीका होताना दिसत आहे. भाजपमध्येच निधी वाटपावरून सुरू असणाऱ्या गदारोळावर हा स्पेशल रिपोर्ट