वाळू माफियांचा पूर्णा नदीवर घाला; दिवसा ढवळ्या सर्रासपणे वाळू उपसा सुरूच, प्रशासन मात्र ढिम्म
पूर्णा नदी पात्राती वाळू राजरोसपणे वाळू माफिया काढत आहेत. तो ही कोणतेही लिलाव झाला नसताना. त्यामुळे पूर्णा नदी पात्रात पाण्या ऐवजी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे.
बुलढाणा : काही दिवसांपुर्वीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने रेती माफिया (Sand Mafia), बेकायदा उत्खननाला आता चाप लगावण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) सुधारित रेती/वाळू धोरण लागू केलं जाणार आहे. मात्र त्याच्या आधीच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पालकमंत्री असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात वेगळेच चित्र समोर येत आहे. येथे पूर्णा नदी पात्राती वाळू राजरोसपणे वाळू माफिया काढत आहेत. तो ही कोणतेही लिलाव झाला नसताना. त्यामुळे पूर्णा नदी पात्रात पाण्या ऐवजी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. तर दररोज हजारो ब्रास वाळू ही गोळेगाव खुर्द, हुरसाल, माऊली, जळगाव घाट, रोटी, भोटा सह इतर ठीकणावरून चोरून नेल्या जात आहे. मात्र यावर कारवाई करण्याची ज्या महसूल विभागाची जबाबदारी आहे, ते झोपेचे सोंग घेताना दिसतेय. या वाळू चोरीची दृश्ये द्रोण केमराने घेतलीय. महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यात अवैध वाळू उपशामुळे एका युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता.