शिवसेना मंत्र्याची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका, म्हणाले, चुकीचे कंडक्टर
यादरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच आपण उद्धव ठाकरे यांना सावध होण्याचा सल्ला दिला होता.
जळगाव : राज्यात सत्ता बदलांच्या चर्चांना उत आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार पडणार असा दावा केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच आपण उद्धव ठाकरे यांना सावध होण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय असे म्हटलं होतं. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली. शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे. हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे काँग्रे-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही, असं पाटील म्हणाले. तसेच जर राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करू असंही पाटील म्हणाले.