Special Report | जुन्यावरून वाद, नवीन जाहिरात दिली, मात्र डॅमेज कंट्रोल काही झालं नाही; उलट काय झालं पहा युतीत…
जाहिरातींवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन सुरू झालेला वाद हा आता सरकार स्थापन आणि पाठिंब्यापर्यंत गेला आहे. तर सर्व्हेच्या जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आधी प्रविण दरेकर त्यांनंतर खासदार अनिल बोंडे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या.
मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आता काहीच दिवसात एक वर्ष पुर्ण होत आहे. मात्र त्याआधीच जाहिरातींवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन सुरू झालेला वाद हा आता सरकार स्थापन आणि पाठिंब्यापर्यंत गेला आहे. तर सर्व्हेच्या जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आधी प्रविण दरेकर त्यांनंतर खासदार अनिल बोंडे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. याच्यानंतर थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर आश्चर्य व्यक्त करत उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणं योग्य नसल्याचे म्हटलं. तर नव्या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजपला काही सवाल केले. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी तर टीका करताना, भाजपने शिंदे गटाला बांबूच घातला असा टोला लगावला. त्यानंतर या प्रकरणावरून युतीतच मिठाचा खडा पडला असून धुसफूस होत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट