cabinet expansion : रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला; वर्षा निवासस्थानी वेगवान हालचाली

cabinet expansion : रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला; वर्षा निवासस्थानी वेगवान हालचाली

| Updated on: Jul 02, 2023 | 1:48 PM

याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून हा विस्तार लवकरच होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे एकादशीनंतर अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन 1 वर्ष पुर्ण झालं आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे घोंगडे एका वर्षानंतरही भिजत पडलं आहे. याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून हा विस्तार लवकरच होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे एकादशीनंतर अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता वर्षा निवासस्थानी वेगवान हालचालींना वेग आला आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागल्याचे बोलले जात आहे. तर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा या पावसाळी अधिवेशानाच्या आधीच होण्याची शक्यता आहे. यावेळी वर्षा निवास्थानी दादा भूसे, आनंद अडसूळ आणि गजानन कीर्तिकर हे दाखल झाले असून आज कोण कोण मंत्री होणार त्यांच्या नावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

Published on: Jul 02, 2023 01:48 PM