Count Down सुरु, सरकार जाण्याचे दिवस मोजण्याची वेळ आली, विरोधी पक्षनेत्यांची टीका

Count Down सुरु, सरकार जाण्याचे दिवस मोजण्याची वेळ आली, विरोधी पक्षनेत्यांची टीका

| Updated on: Sep 18, 2023 | 11:54 PM

विधानसभा अध्यक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार कधीही जाऊ शकते. त्याचे आजपासून Count Down सुरु झाले आहे. आम्ही जे म्हणत होतो की हे सरकार असंविधानिक आणि अनैतिक सरकार आहे ते आता कोर्टानेच म्हटले आहे.

नागपूर : 18 सप्टेंबर 2023 | राज्यात आलले हे सरकार अनैतिक सरकार आहे. असंविधानिक सरकार आहे. त्याला न्यायालयाने पुष्ठी दिली आहे. शेड्युल 10 च्या अंतर्गत हा निर्णय लवकर व्हावा असे अपेक्षित होते. परंतु, विधानसभा अध्यक्ष यांनी बराच वेळ घेतला. अध्यक्ष यांना हे प्रकरण सुनावणीसाठी पुढे ढकलण्याची गरज नव्हती. पण, त्यांनी पुढची तारीख दिली. त्यांनी तीन महिन्यात निकाल देण्याची अपेक्षा होती. आता त्यांना फार डीले करता येणार नाही असे निरीक्षण कोर्टाने केले आहे. त्यामुळे या सरकारचे आजपासून Count Down सुरु झाले आहे. सरकारचे जाण्याचे दिवस आणि सत्तेतून घालविण्याचे दिवस मोजण्याची वेळ आली आहे. आम्ही जे म्हणत होतो की हे सरकार असंविधानिक आणि अनैतिक सरकार आहे ते आता कोर्टानेच म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Published on: Sep 18, 2023 11:53 PM