जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस लागले कामाला! एकत्र येणार येथील कार्यक्रमात
कोल्हापूर येथील अचानक दौरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द केला होता. त्याच दिवशी शिंदे गटाची ती जाहिरात आली होती. ज्यावरून इतका गदारोळ सुरू आहे. याच्यानंतर हे वाद संपवण्यासाठी शिंदे गटानं पुन्हा एक जाहिरात दिली ज्यात फडणवीस यांच्या सह शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला.
मुंबई : राज्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून शिंदे गटात आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. जाहिरातबाजीवरून युतीतच सध्या वादंग होत आहे. याच्याआधी कोल्हापूर येथील अचानक दौरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द केला होता. त्याच दिवशी शिंदे गटाची ती जाहिरात आली होती. ज्यावरून इतका गदारोळ सुरू आहे. याच्यानंतर हे वाद संपवण्यासाठी शिंदे गटानं पुन्हा एक जाहिरात दिली ज्यात फडणवीस यांच्या सह शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला. मात्र यात देखील फडणवीस यांच्याशी शिंदे यांची तुलना करण्यात आल्यानं आता हा वाद आणखीन वाढला आहे. याचदरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिंदे गट आणि भाजपमधील वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे येथे फडणवीस काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे.