“चोरीचा आरोप खोटा, त्यांच्यावर केस घ्या”, शिवसैनिक पेटले!
शिवसैनिकांवरील चोरीचा आरोप मागे घेण्यात यावा आणि सदा सरवणकर यांच्यावरील केस घेण्यात यावी अशी मागणी हे शिवसैनिक करतायत.
5 शिवसैनिकांना अटक करण्यात आल्या नंतर आता दादर स्टेशन बाहेर शिवसैनिकांचा राडा सुरु आहे. शिवसैनिकांवरील चोरीचा आरोप मागे घेण्यात यावा आणि सदा सरवणकर यांच्यावरील केस घेण्यात यावी अशी मागणी हे शिवसैनिक करतायत. जोपर्यंत सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही आम्ही इथून हटणार नाही असं या शिवसैनिकांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान आमदार सदा सरवणकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. दादर पोलीस यासंदर्भात चौकशी करणार आहेत. सरवणकर यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसांची माहिती घेण्यात येणार आहे. दादर परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा तपासले जाणार आहेत.पोलिसांकडून साक्षीदारांनाही शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गट आणि शिवसैनिक कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलवणे यांनी फिर्याद दिली आहे.