शिंदेंना, अयोध्येची वाट आम्ही दाखवली; राऊतांचा घणाघात, म्हणाले…
सत्तांतरानंतर तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आयोध्येला जणार असून त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार आणि खासदारही रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आयोध्या दौऱ्यावह जाणार आहेत. ते आज 6 एप्रिलला आयोध्या दौऱ्यावर आहेत. सत्तांतरानंतर तर मुख्यमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच आयोध्येला जणार असून त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार आणि खासदारही रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी, ते आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना आयोध्यातील गल्लीबोळ माहित झाले असतील असा टोला लगावला आहे. मात्र त्यांना प्रथम आयोध्या आम्ही दाखवली. आम्ही म्हणजे शिवसेनेनं. त्यांना याच्या आधी आयोध्येची वाटतरी माहित होती का? आम्ही दाखवली असेही ते म्हणाले.
Published on: Apr 05, 2023 01:03 PM
Latest Videos