अजित पवार मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसले? भरत गोगावले म्हणतात, ‘काही त्रास? सगळं ओके…’
मात्र या कार्यक्रमाच्या वेळी एका प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार टीकेचे धनी ठकरे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात स्टेजवर ठेवण्यात आलेल्या अजित पवार बसल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | मुंबई येथील बहुप्रतिक्षित मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी एका प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार टीकेचे धनी ठकरे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात स्टेजवर ठेवण्यात आलेल्या अजित पवार बसल्याने नवा वाद सुरू झाला आहे. तर ही खुर्ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यावर जाऊन स्वत: अजित पवार बसल्याने हा वाद सुरू झाला आहे. यावरून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दोन शब्दात हा विषय संपवत टीकाकरणाऱ्यांना बाजूला केलं आहे. गोगावले यांनी मुख्यंत्री शिंदे यांना ताप आल्याने ते येऊ शकले नाहीत. तर त्यांची खुर्ची रिकामी असल्यानेच स्वत: विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी खुर्चीचे स्टीकर काढून अजितदादांनी तेथे बसवले. तर तो प्रकार हा अनावधानाने झाला. त्यात कोणताही तर्क काढण्याची गरज नाही. युतीत सगळं ठिक असून काही त्रास नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.