एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून 'ही' अपेक्षा, शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं

एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ही’ अपेक्षा, शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं

| Updated on: Feb 11, 2023 | 9:34 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता.

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. आपण राजकारणामध्ये आहोत. दुष्मन थोडे आहोत. त्यांचे राजकीय मतभेद असले तरी ‘एकनाथ’ तू चांगले काम करत आहेस. माझ्याकडून वाढदिवसाला शुभेच्छा एवढं एक वाक्य म्हणायला काय जातं. मुख्यमंत्री शिंदे यांना फोनवरून हे एक वाक्य बोलले असते तर काय झालं असतं ? उद्धव ठाकरे यांनी एक फोन करायला हवा होता. ही आपली संस्कृती आहे. उद्धव साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचा एक फोन निश्चित गेला पाहिजे होता अशी अपेक्षा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.