राज ठाकरे यांना भाजपची ऑफर शिंदे गटाचा नेता म्हणतो, ‘कोणासोबत जावं, नाही जावं…’
स्वत: राज ठाकरे यांनी दावा करताना, भाजपने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र आधीच त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने आपण यावर कोणताच निर्णय घेतला नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
बुलढाणा, 15 ऑगस्ट 2023 | भाजपने मनसेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी दावा करताना, भाजपने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र आधीच त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने आपण यावर कोणताच निर्णय घेतला नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर राज ठाकरे यांनी त्या प्रस्तावावर फक्त विचार केलेला नाही असं म्हटल्याने ते भाजपसोबत जाणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर याचमुद्द्यावरून राजकीय नेते आता आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावरून शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे कोणासोबत जावं, नाही जावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर जो तो पक्ष वाढीसाठी राज्यातल्या कर्तृत्ववान लोकांना ऑफर देणारच असं म्हटलं आहे.