Cabinet Expansion : अजित पवार यांचा झाला आता शिंदे गटाचासाठी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; शिंदे गटाच्या नेत्याचे सुतोवाच
शिंदे आणि भाजप गटातील नेत्यांनी आपली वर्णी या मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागेल अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. मात्र झालं दुसरचं आणि शपथ घेतली अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने.
मुंबई : दोन दिवसापुर्वीच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. तेव्हा तो फक्त शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांसाठीचा असेल असे बोलले जात होते. त्याप्रमाणे शिंदे आणि भाजप गटातील नेत्यांनी आपली वर्णी या मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागेल अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. मात्र झालं दुसरचं आणि शपथ घेतली अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने. त्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारंनी खाते वाटपावरून त्यांच्या मनातील खदखद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आहे. तर महत्वाची खाती राष्ट्रवादीला देऊ नये अशीही मागणी केली आहे. त्यानंतर यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी बोलताना, अजित पवार यांना कोणतही खाते दिलं तरी त्याला शिंदे गटाचा विरोध नाही असे म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी मविआच्या काळात त्यांचा पक्ष मजबूत करत असल्यानेच अजित पवार यांना तेंव्हा विरोध होता. पण आता तसा विरोध नाही. त्याचबरोबर त्यांनी मंत्रिमडळ विस्ताराबाबत बोलताना आतका लवकरच म्हणजे 2 ते 3 दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होईल असेही ते म्हणालेत. त्यांच्या या सुचक वक्तव्यामुळे अनेक नाराज झालेल्या शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.