राऊत यांच्या ‘त्या’ दाव्यावर शिंदे गटातील मंत्र्याचा टोला, गौप्यस्फोटाची हवा काढत म्हणाला, ‘उलट शिंदे यांनीच…’
याचदरम्यान आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. राऊत यांनी 2019 मध्ये फक्त 50-50 टक्केवरूनच नाही तर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असे म्हटलं होतं.
औरंगाबाद, 13 ऑगस्ट 2023 | नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांशी बोलताना 2019 मध्ये आम्ही तर शिनसेननं युती तोडली असं म्हटलं होत. त्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. राऊत यांनी 2019 मध्ये फक्त 50-50 टक्केवरूनच नाही तर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असे म्हटलं होतं. मात्र त्याला भाजपने विरोध केला होता. तर यामुळेच युती तुटली असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आता खळबळ उडाली आहे. तर शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुंबरे यांनी, भाजपचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध नव्हता, मात्र एकनाथ शिंदे यांनीच मागच्या वेळी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला सांगितलं होतं असा पलटवार केला आहे. तर शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं होतं. भाजपचा यात काहीही संबंध नाही. भाजपचा एकनाथ शिंदे यांना विरोध असता तर आता भाजपनेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नसतं. त्यांनाच आता मुख्यमंत्री केलेलं आहे. संजय राऊत याला काहीही काम नाही, तो काहीही बोलत असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असा टोला देखील भुंबरे यांनी लगावला आहे.