‘राऊत काय म्हणतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही’; राऊत यांच्यावर कोणी केली टीका
राऊत यांनी ईडीच्या छापेमारीवरून आरोप केले होते. तर फक्त ईडीच्या कारवाईतून आपली कातडी वाचवण्यासाठीच उद्धव ठाकरे गटातून लोक फूटत असल्याचा दावा केला होता.
सातारा : ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयावर काल ईडीचे छापे पडले. त्यावरून राऊत यांनी ईडीच्या छापेमारीवरून आरोप केले होते. तर फक्त ईडीच्या कारवाईतून आपली कातडी वाचवण्यासाठीच उद्धव ठाकरे गटातून लोक फूटत असल्याचा दावा केला होता. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, राऊत काय म्हणतात याला आम्ही महत्त्व देत नाही. तर प्रसार माध्यमाला मी हात जोडून विनंती करतो की खरी आणि अधिकृत शिवसेना ही आमचीच आहे. त्यामुळे कोणी ठाकरे गटातून आमच्यात येत नाही तर ते मुळ शिवसेनेत येत आहेत. निवडणूक आयोगाने आमच्याच पक्षालाच अधिकृत शिवसेना म्हणून घोषित केलंय. तर माझं राऊत यांना एका वाक्यात उत्तर आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाचा. तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हीच सांगितलं पाहिजे की आमची चौकशी करा. ज्यांच्या मनात चौकशीबाबत शंका आहे अशीच मंडळी असे विधान करत असतात. होऊ द्या चौकशी येऊ द्या सत्य बाहेर असं त्यांनी म्हटलं आहे. तर राऊत हे चार टर्मचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना केंद्राची कार्य प्रणाली माहीत असायला हवी असा टोला लगावला आहे. maharashtra politics