त्यांच्या कागदपत्रात चुका, धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, आम्हीच गुलाल उधळणार, हा कुणाचा विश्वास?
निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाणाचा वाद सुरु आहे. पण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार. त्यांचे तेथे काही होणार नाही.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भर जोडो यात्रेत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत सहभागी झाले. यावरून शिंदे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा माणूस चमको असून शिवसेना भवनात त्याचा फोटो लावायला कमी करणार नाही अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
संजय राऊत सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यातच त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठीचा वचक राहिला नाही. संजय राऊत पाहिजे तशी वक्तव्य करत असले तरी उद्धव ठाकरे त्यांना काहीच का बोलत नाही, त्यांना आवरत का नाहीत, पक्ष रसातळाला चालला आहे तरी यांचे डोळे उघडत नाहीत अशी टीका त्यांनी केली.
निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाणाचा वाद सुरु आहे. पण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार. त्यांचे तेथे काही होणार नाही. कागदोपत्री त्यांच्या असंख्य चुका आहेत. त्यामुळे ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आली आहे असे शिरसाट म्हणाले.