सुषमा अंधारे व राखी सावंत एकमेकींच्या स्पर्धक; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चा

सुषमा अंधारे व राखी सावंत एकमेकींच्या स्पर्धक; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चा

| Updated on: Apr 06, 2023 | 2:16 PM

भाजपचे नेते मोहित कंबोज हे त्यांच्या ट्विटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांचे ट्विट चर्चेत आले असून त्यांनी हे ट्विट सुषमा अंधारे व राखी सावंत यांच्यावर केले आहे

मुंबई : शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. त्याचवेळी भाजपच्या एका नेत्याच्या ट्विटमुळे आणखीन वारावरण तंग होणार आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज हे त्यांच्या ट्विटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांचे ट्विट चर्चेत आले असून त्यांनी हे ट्विट सुषमा अंधारे व राखी सावंत यांच्यावर केले आहे. यामध्ये त्यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका कंबोज यांनी केली आहे. तर या दोघी सनसनाटीमध्ये एकमेकींच्या स्पर्धक आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी सिनेमात आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Published on: Apr 06, 2023 02:16 PM